भारत चीनमध्ये तणावाची काय कारणं आहेत? #सोपीगोष्ट
भारत-चीन सीमाप्रश्न नवा नाहीय. 9 डिसेंबर 2022 रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. याआधी देखील बऱ्याच वेळी असे संघर्ष घडले असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहेत.
1962 चं युद्ध असेल किंवा 1967 मध्ये नथु ला खिंडीत झालेला संघर्ष असेल, दोन्ही देशांची लष्करं जवळपास साडेतीन हजार किलोमीटर सीमेचं रक्षण करण्यासाठी अत्यंत खडतर अशा भूभागात उभी आहेत. पण नेमका कुठला भाग कोणाचा यावरून सुरू असलेला वाद सुटत नाहीये.
गेल्या सुमारे 40 वर्षांत चकमकी होऊन सैनिक मारले जाण्याची घटना घडली नव्हती. गलवान व्हॅलीच्या या घटनेने त्याला छेद दिलाय. भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून वाद का होतो? दोन्ही देशांच्या सीमा वादाचा इतिहास काय आहे? आणि गलवानमध्ये झालेल्या तणावपूर्ण घटनेमागची तीन कारणं काय आहेत?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)