कोरोना: डायबेटिस असलेल्यांनी शुगर का सांभाळायची? #सोपीगोष्ट 100
कोमॉर्बिडिटी म्हणजे आधीपासूनच कुठलातरी आजार असणाऱ्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त आहे. या कोमॉर्बिडिटीमध्ये उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनीचे आजार आणि अर्थातच मधुमेह आहे आणि भारत मधुमेहाची म्हणजे डायबेटिसची 'जागतिक राजधानी' म्हणून ओळखला जातो.
मधुमेहाच्या रुग्णांना कोरोना व्हायरसचा धोका इतरांपेक्षा जास्त आहे का?
हो.
पण धोका आहे म्हणजे मधुमेह असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर त्याचा मृत्यू होतोच का?
नाही.
यात अनेक गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच आज आपण बोलणार आहोत की मधुमेहाच्या रुग्णांनी कोरोनाच्या काळात नेमकी काय विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
संशोधन- मयंक भागवत
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- शरद बढे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)