You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: कोव्हिड सारखे आजार भविष्यातही येतील? - पाहा व्हीडिओ
कोरोना विषाणूचा उगम नेमका कुठे झाला या प्रश्नाचं उत्तर अजूनही सापडलेलं नाही. ज्या एका गोष्टीबद्दल तज्ज्ञांचं एकमत झालंय ते म्हणजे वन्यप्राण्यांमधून हा व्हायरस माणसांत शिरला आणि हे एवढ्यावर थांबणार नाहीये.
मानवी वस्तीचं नैसर्गिक जगावरचं आक्रमण पाहता शास्त्रज्ञांनी धोक्याचा इशारा दिलाय. पण म्हणजे कोरोना व्हायरस हे शेवटचं आरोग्य संकट नसेल का? शास्त्रज्ञ नेमकं काय म्हणतायत? बदलती जीवनशैलीच माणसांना घातक ठरतेय का?
मानव आणि प्राण्यांमधला संघर्ष आरोग्य संकटांचं रुप धारण करून आपल्याला अंगाशी येऊ शकतो का? या आणि अशा इतर काही प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत या सोपी गोष्टमध्ये.
संशोधन व निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- शरद बढे
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)