कोरोना व्हायरस: तुमची रोगप्रतिकारक क्षमता कशी वाढवाल? - सोपी गोष्ट
कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर मृत्यूचं प्रमाण साधारण 3 टक्के आहे. म्हणजे 100 जणांना कोरोनाची लागण झाली तर 3 जणांचा जीव जातो, पण 97 माणसं बरी होऊन घरी जातात.
ही सुमारे 97 टक्के माणसं बरी होतात ती त्यांच्या अंगात असलेल्या रोगप्रतिकारक क्षमतेमुळे. ही क्षमता काय असते आणि ती वाढवता येते का, हे आता पाहूया.
जेव्हा आपल्या शरीरावर सूक्ष्मजीव हल्ला करतात, तेव्हा आपण आजारी पडतो. हे हल्ले आपल्यावर सतत होत असतात. या हल्ल्यांना रोखण्यासाठी आपल्या शरीराने एक यंत्रणा तयार केली आहे. त्यालाच रोग प्रतिकारक क्षमता म्हणतात. इंग्रजीत याला इम्युनिटी असं म्हणतात.
ही यंत्रणा पावरफुल असेल तर आपण हल्ला झाला तरी आजारी पडत नाही. पण ही यंत्रणा कमकुवत असेल किंवा हल्ला करणारा सूक्ष्मजीव खूप जास्त पावरफुल असेल तर आपण आजारी पडतो. हे नेमकं कसं होतं ते जाणून घ्या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
#CoronaVirus #Covid19 #कोरोनाव्हायरस #सोपीगोष्ट
व्हीडिओ - विनायक गायकवाड
संहिता - तुषार कुलकर्णी
शूट-एडिट - निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)