येस बँक का आली संकटात? बँकेच्या ग्राहकांनी आता काय करावं?
येस बँकेच्या ग्राहकांना आता फक्त 50 हजार रुपयेच अकाऊंटमधून काढता येणार आहेत. बँकेच्या मॅनेजमेंटमधील गैरव्यवहार पाहता रिझर्व्ह बँकेने पुढचा एक महिना हे निर्बंध लादले आहेत.
मात्र बँकेतील ठेवीदारांचे पैसे अगदी सुरक्षित असून आपण या 30 दिवसांच्या मुदतीपूर्वीच बँकेला संकटातून उभारण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. तसंच सर्व ग्राहकांना व्यवहार करताना कुठल्याही अडथळा येणार नाही, यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत, असं RBIने नियुक्त केलेले येस बँकेचे अॅडमिनिस्ट्रेटर प्रशांत कुमार म्हणाले.
पण येस बँकेवर ही वेळ का आली? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर
निर्मिती – निलेश भोसले
वाचा संपूर्ण बातमी - 'आम्हाला वाटायचं की आमच्या बँका सर्वाधिक सुरक्षित आहेत, पण तसं अजिबात नाही'
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)