Holocaust: ऑश्वित्झ नाझी छळछावणीतील आयुष्य कसं होतं?
जर्मनीत दुसऱ्या महायुद्धावेळी ज्यू धर्मियांवर अमानुष अत्याचार झाले होते. त्यावेळी नाझी छळछावण्यांमध्ये 60 लाख ज्यूंची हत्या करण्यात आली होती.
जगातला हा खूप मोठा वंशसंहार मानला जातो. कुप्रसिद्ध ऑश्वित्झ छळछावणीचा अस्त होण्याला 75 वर्षं पूर्ण होत आहेत. या छळछावणीतून सुखरूप वाचलेल्या 84 वर्षांच्या रिना क्विंट यांची कहाणी हेलावून टाकते.
त्या सांगतात "आज 75 वर्षं उलटून गेल्यावर ज्यू विरोध परत येतोय आणि आपण भूतकाळातून धडे घेतले पाहिजेत. जगाला छळछावणीच्या गोष्टी आठवणार नाहीत याची मला काळजी वाटते, सीरिया आणि अफगाणिस्तानमध्ये काय चाललंय हे लोक विसरलेयत. जे गरीब आहेत अशांनाही लोक विसरलेयत."
पाहा हा व्हीडिओ रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
