Lady TV: बंधनं झुगारून मुलींनी काढलं ऑनलाईन चॅनल - व्हीडिओ
पाकिस्तानमधल्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील डेरा ईस्माईल खान या दहशतवाद आणि हिंसाचाराने ग्रासलेल्या भागामध्ये पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलेल्या काही तरूणींनी इतिहासात पहिल्यांदाच ‘लेडी टीव्ही’ नावाचं एक वेब पेज सोशल मीडियावर सुरू केलं आहे.
इथं प्रत्येकाला सगळी कामं येतातच असं नाही. कुणी रिपोर्टींग करतं, कुणी एडिटींग करतं, काहीजण कॅमेऱ्याशी संबंधित कामं करतात.
सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाचीही त्यांना मदत झाली. ज्या मुलींना बाहेर पडून काम करणं शक्य नाही, त्या घरातूनच काम करत आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)