शेतकरी कर्जमाफीचं काय झालं? - पाहा व्हीडिओ

राज्यातल्या 89 लाख शेतकऱ्यांना 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017' म्हणजेच कर्जमाफी योजनेचा लाभ होईल असं सरकारनं जून 2017च्या शासन निर्णयात नमूद केलं होतं.

89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होईल, असं सरकारनं जून 2017मध्ये म्हटलं, पण दोन वर्षं उलटल्यानंतर केवळ 43 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर 18 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र सरकारनं जून 2017मध्ये राज्यात 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017' लागू केली.

ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दीड लाख रुपयांच्या आत आहे, त्यांचं कर्ज सरसकट माफ करण्यात आलं. शेतकरी अल्पभूधारक आहे की नाही, हे विचारात न घेता ही योजना लागू झाली.

ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दीड लाख रुपयांहून जास्त आहे, त्यांनाही या योजनेचा काही अंशी फायदा मिळणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)