माकडात मानवी मेंदूच्या जनुकांचं यशस्वी रोपण; नैतिकतेचा मुद्दा ऐरणीवर

मानवी मेंदूच्या क्षमता नेमक्या कशा विकसित झाल्या आहेत, यावर संशोधन सुरू आहे. या अभ्यासाठी शास्त्रज्ञांनी मानवी मेंदूतील जनुकांचं रोपण माकडांच्या मेंदूमध्ये केलं.

कनमिंग इन्स्टिट्युट ऑफ झूऑलॉजी आणि चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेसनं हा प्रयोग केला आहे. या प्रयोगाचे निष्कर्ष शास्त्रज्ञांसाठी निश्चितच सुखावणारे होते.

माकडांच्या मेंदूतील क्षमतांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर बदल झालेला दिसला. पण एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यू मासिकानं या प्रयोगाबद्दल काही नैतिक प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रयोगाच्या दोन्ही बाजू जाणून घेऊया.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)