चेहऱ्यावरच्या व्रणांनी जेव्हा तिचं सौंदर्य वाढवलं... - व्हीडिओ
इसाबेला सांता मारिया यांना इन्स्टाग्रामवर 60 हजाराहून जास्त फॉलोवर्स आहेत. लघू उद्योगापासून ते फॅशन आणि त्वचा सौंदर्य या सगळ्यांविषयी त्या इंन्स्टाग्रामावर चर्चा करतात.
किंत्सुगी ही तुटलेल्या भांड्याला सोनेरी झळाळी देण्याची कला आहे. लहानपणी अपघात झाल्यावर इसाबेला किंत्सुगी ही जपानी कला शिकल्या. चेहऱ्यावरचे व्रण हे किंत्सुगी या कलेच्या आधार कसे अधिक सुंदर करता येतात याविषयी त्या चर्चा करतात.
त्या सांगतात, "खूप दिवसांपासून हे व्रण माझ्याकडून काहीतरी हिरावून घेत अल्यासारखं वाटत होतं. हा एक कलंक असल्यासारखं वाटत होतं. माझी दररोज छळवणूक होत असल्यासारखं वाटायचं. मी आरशात पाहायचे पण काहीच बदलायचं नाही.
"मलाच माझ्या मनात बदल करून घ्यावा लागला. आयुष्यात घडणारे असे अपघात समजून घ्यावे लागतात. दु:खद घटना या नैसर्गिक आहेत आणि त्या आपल्या आयुष्याचाच भाग आहेत.
किंत्सुगीविषयी इसाबेला इतर लोकांना सांगते. तेव्हा ते 'वा हे किती भारी आहे,' असं म्हणतात.
अधिक माहितीसाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)