बेलारूसमध्ये सापडली 1 हजार ज्यू लोकांची सामूहिक कबर

बेलारूसमध्ये ज्यू लोकांची सामूहिक कबर सापडली आहे. दुसऱ्या महायुद्धच्या काळातल्या 1000 ज्यूंचे हे अवशेष आहेत.

बिल्डिंग बांधण्यासाठी खोदकाम करताना याचा शोध लागला. बेलारूसमधल्या ब्रेस्ट शहरातल्या नरसंहारात ज्यूंची घरं उद्ध्वस्त झाली होती.

जर्मनीच्या राजवटीत या शहराच्या काही भागात ज्यूंचा घेटो होता. अंदाजे 18 हजार ज्यूंना या छळछावणीत डांबलं आणि नंतर मारलं.

त्या जागेवर स्मारक बांधावं अशी ज्यू संघटनांनी मागणी केली आहे. पण बेलारूसकडून कोणतंही आश्वासन मिळालं नाही.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)