मुंबईतल्या क्वान कुंग मंदिरात चिनी नववर्षाचं स्वागत

मुंबईचं एकमेव चायनीज टेंपल चिनी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. मुंबईच्या माझगाव गोदीजवळ नवाब टँक रोडवर एका जुन्या इमारतीत 1919 पासून हे मंदिर वसलं आहे.

या परिसरात तसंच लॅमिंग्टन रोडजवळ एकेकाळी चिनी वंशाच्या लोकांची वस्ती होती. 1962 साली भारत-चीन युद्धानंतर त्यातल्या अनेकांनी हाँगकाँग, सिंगापूर, मलेशिया अशा ठिकाणी स्थलांतर केलं. पण काहीजण इथेच थांबले.

कोलकात्याच्या प्रसिद्ध ‘चायना टाऊन’इतकी मोठी वस्ती मुंबईत आज उरली नाही. तरीही वंशानं चिनी पण भारतीय नागरिक असलेल्या मोजक्या नागरिकांनी मुंबईतला चिनी वारसा जपून ठेवला आहेत. इथल्या परंपरांमध्ये मिसळल्यानं त्या धर्मांनंही भारतीय रूप घेतलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)