मुंबई मेट्रोच्या कारशेडमुळे आरेचं जंगल धोक्यात
मुंबईतलं आरेचं जंगल सध्या धोक्यात आलं आहे. राज्य सरकारनं आरेच्या जंगलात मुंबई मेट्रोच्या कारशेडला परवानगी दिली आणि त्यावरून राजकीय वादळ उभं राहिलं आहे.
या कारशेडमुळे या जंगलातल्या तब्बल तीन हजार झाडांवर संक्रांत येणार आहेत. पण त्याचबरोबर या जंगलात राहणाऱ्या वारली जमातीवरही स्थलांतराची वेळ ओढावली आहे. याविषयी काम करणाऱ्या काही स्थानिकांशी आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी बीबीसी मराठीनं बातचीत केली. याबद्दल सरकारलाही त्यांची प्रतिक्रिया विचारली होती. पण आत्तापर्यंत सरकारकडून कोणतंही उत्तर मिळालं नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)