महाराष्ट्र केसरी : एक चांगला पैलवान होण्यासाठी काय करावं लागतं?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : एक चांगला पैलवान होण्यासाठी काय करावं लागतं?

एक चांगला पैलवान होण्यासाठी काय करावं लागतं? महाराष्ट्र केसरी स्पर्धा आल्यावर पैलवान कशी तयारी करतात? याविषयी आम्ही सागर बिराजदार यांच्याकडून जाणून घेतलं.

सागर बिराजदार म्हणतात, आम्ही सकाळी साडेचारला उठतो. पाचला आम्ही सपाटे, जोर या व्यायामाला सुरूवात करतो, ते सव्वा सहापर्यंत चालतं. तिथून पुढे आम्ही ग्राऊंडवर रनिंगला जातो. ते झाल्यावर आम्ही तालमीवर येतो. नाश्ता करतो. तेवढ्यात सकाळचं शेड्यूल संपतं. अकरा वाजता येऊन आम्ही मॅटवरती एक तास टेक्निक प्रॅक्टिस करतो. 12 वाजता जेवण करतो. जेवण झालं की,दुपारी 3.30 ला आमचं दुसरं शेड्यूल सुरू होतं. सुरूवात बैठकीपासून होते. तिथून पुढं लढत करतो. लढत झाल्यावर अजून सपाटे, व्यायाम करतो. अशा प्रकारे आमचा दिवस संपतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)