अमेरिकेच्या दारावर पोहोचला स्थलांतरितांचा पहिला जत्था - व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, अमेरिकेच्या दारावर पोहोचला स्थलांतरितांचा पहिला जत्था

मध्य अमेरिकेतल्या होंडुरास, एल साल्वादोर, ग्वाटेमाला या देशांमधून निघालेल्या स्थलांतरितांचा पहिला जत्था अमेरिकेच्या सीमेवर पोहोचला आहे. मात्र त्यांना अमेरिकेत प्रवेश मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे.

या स्थलांतरितांना अमेरिकेत जाण्यासाठी कोणते कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत, याची कोणतीच माहितीच नसल्याचं आढळून आलं आहे. तसंच अमेरिकेनंही आपल्या सीमेवर तब्बल 5,800 सैनिक तैनात केले आहेत. या स्थलांतरितांना रोखण्याचं काम हे सैनिक करणार आहेत.

बीबीसीचे प्रतिनिधी विल रँट यांचा मेक्सिकोमधून रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)