होंडुरासच्या स्थलांतरितांचे अमेरिका प्रवेशाचं स्वप्न पूर्ण होईल? - व्हीडिओ
होंडुरासमधून मेक्सिकोमार्गे अमेरिकेत शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असलेल्या हजारो स्थलांतरितांना थांबवण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राधयक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे.
या स्थलांतरितांनी ग्वाटेमाला पार करत दक्षिण मेक्सिकोमध्ये शिरकाव केला आहे आणि ते उत्तरेकडे अमेरिकेच्या दिशेने येत आहेत. त्यांच्या देशात आपली सगळी स्वप्न पूर्ण करण्याच्या आशा संपल्यानेच त्यांनी अमेरिकेचा रस्ता धरल्याचं होंडुरासच्या नागरिकांनी सांगितलं. हे लाखो नागरिक अमेरिकेत प्रवेश करू पाहत असतानाच प्रथम त्यांना मेक्सिकोत अडवण्यात आलं. मात्र, नंतर ट्रंप यांनी इशारा देऊनही मेक्सिको सरकारनं या स्थलांतरितांना पुढे जाण्यास परवानगी दिली आहे. या सगळ्या प्रकाराचा बीबीसीनं आढावा घेतला आहे.
बीबीसीचे प्रतिनिधी अली मकबुल यांचा मेक्सिकोहून रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)