कॅन्सरग्रस्त महिलांना केसांची अनोखी भेट

व्हीडिओ कॅप्शन, कराचीतल्या महिला करतात कॅन्सरग्रस्त महिलांना केसांचे दान

पाकिस्तानतल्या कराचीस्थित डेपीलेक्स ब्युटी क्लिनिकमध्ये नेहमी येणाऱ्या 50 महिला आपले केस कापतात ते फॅशन म्हणून नाही तर खास कॅन्सरग्रस्त महिलांना केस मिळावेत म्हणून.

त्यांनी दान केलेल्या केसांचे विग तयार केले जातात ज्यामुळे कॅन्सरशी लढणाऱ्या महिलांना खऱ्या केसांचे विग मिळतात.

यासाठी 'हेअर टू हेल्प' या स्टार्टअप कंपनीने पुढाकार घेतला आहे. या ब्युटी क्लिनिकमध्ये आलेले केस ही कंपनी गोळा करते आणि ते चीनला पाठवते. चीनमधून या केसांचे विग तयार होऊन येतात. हे विग कॅन्सरग्रस्त महिलांना वापरण्यासाठी दिले जातात. त्यामुळे कॅन्सरग्रस्त महिलांना समाजात वावरताना आता लाज वाटत नाही तर आता त्या आयुष्याला नव्या आत्मविश्वासाने सामोऱ्या जातात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)