Deep Fakes: एक असं तंत्रज्ञान जे तुमच्याकडून काहीही वदवून घेऊ शकतं

व्हीडिओ कॅप्शन, DEEP FAKE : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात फसवणूकही सोपी

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भाग असलेलं फेशियल मॅपिंग तंत्रज्ञान टीव्हीसाठी वरदान ठरलं आहे. याचा वापर करून जर बोलताना आपली चूक झाली असेल तर ती आपल्याच एका जुन्या वक्तव्याच्या आधारे दुरुस्त करता येऊ शकते.

पण या तंत्रत्रानाचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. उदाहरणार्थ, या तंत्रज्ञानामुळे इतरांनी बोललेली वाक्यं आपण बोलत असल्यासारखी दाखवता येऊ शकतात.

हे संगळं थोडं गुंतागुंतीचं वाटतंय ना? हे सगळं फेशियल मॅपिंगच्या मदतीने करता येतं. ही भानगड जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हीडिओ नक्कीच पाहावा लागेल.

बीबीसीचे मीडिया एडीटर अमोल राजन यांनी आमच्या #BeyondFakeNews मोहिमेअंतर्गत फेशियल मॅपिंग तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे समजावून सांगितले आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)