अमेरिकेनं माणसांवर जैविक प्रयोग केल्याची रशियानं उठवली फेक न्यूज

व्हीडिओ कॅप्शन, रशियानं अमेरिकेबद्दल उठवली माणसांवरील जैविक प्रयोगाची Fake News

जॉर्जियातल्या एका गुप्त प्रयोगशाळेत अमेरिका माणसांवर प्रयोग करत असल्याची बातमी रशियन प्रसार माध्यमांनी दिली. मात्र, बीबीसीनं प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन या बातमीची शहानिशा केली. यानंतर ही बातमी खोटी म्हणजेच Fake News असल्याचं पुढे आलं.

यासाठी बीबीसीची टीम जॉर्जियातल्या तब्लिसी शहरात गेली. तिथं हेपेटायटीस सीच्या उपचारासाठी काही औषधांद्वारे रूग्णांवर उपचार करण्यात आले होते.

मात्र, ही औषधं मान्यताप्राप्त नसल्याचा दावा रशियाच्या गुप्तचर संस्थेत काम केलेल्या एका एजंटने केला. याबद्दल त्याच्याकडे कागदपत्र असल्याचा दावा त्यानं केला. मात्र, प्रत्यक्ष संशोधन केल्यावर ही बातमी खोटी होती असं पुढे आलं.

या प्रयोगात वापरलेली औषधं मान्यताप्राप्त होती. त्यामुळे बरं झालेल्यांची संख्या काही हजारात आहे. प्रत्यक्ष लॅबमध्ये गेल्यावरही रशियानं केलेले दावे खोटे असल्याचं आढळलं. मात्र, आता पुरावे मिळत नाही म्हणून यात तथ्य नाही असं होत नाही असं रशियन अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

बीबीसीच्या #Beyond FakeNews या मोहिमेअंतर्गत हा रिपोर्ट आमचे मॉस्कोचे प्रतिनिधी स्टीव्ह रोझेनबर्ग यांनी सादर केला आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)