पाहा व्हीडिओ : अफगाणिस्तानात मतदान तर होईल, पण...
अफगाणिस्तानात निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. पण, युद्धाची झळ बसलेला अफगाणिस्तान आणि तिथले नागरिक अजूनही सावरलेले नाहीत. अजूनही तालिबानकडून नागरिक आणि सरकारवर हल्ले सुरूच आहेत.
तालिबानने या निवडणुका म्हणजे परकीयांनी लादलेलं मतदान आहे असं म्हणत मतदारांना यात भाग न घेण्याचा इशारा दिला आहे.
निवडणुका जाहीर झाल्यापासून आत्तापर्यंत 10 उमेदवार मारले गेलेत आणि मतदारांवरही हल्ले झालेत.
बीबीसी न्यूजच्या प्रतिनिधी लिस डुसेट यांचा काबूलमधून रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)