इराणी लोक त्रासले आहेत कारण...
इराणमध्ये दुष्काळ पडला आहे. एकीकडे प्रचंड वाढलेलं तापमान आणि दुसरीकडे आर्थिक आघाड्यांवरचा गैरकारभार यामुळे तिथली जनता निराश झाली आहे.
दुष्काळामुळे पाणीटंचीई आहे. वीज पुरवठा ही खंडित होत आहे. त्यात आर्थिक धोरणांमुळे महागाई 50 टक्क्यांनी वाढली आहे.
इराणी अधिकारी या परिस्थितीला शत्रूला जबाबदार धरत आहेत. मात्र, गैरकारभार आणि चुकीची धोरणं त्याला कारणीभूत आहेत, असं टीकाकारांचं म्हणणं आहे.
कारणं काहीही असली आणि जबाबदार कोणीही असलं तरी सामान्यांच्या जगण्यावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत.
इराण अणू करारातून अमेरिकेने माघार घेतल्यानंतर इराणवर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांचा हा परिणाम आहे का?
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)