'आई तू माझ्या चेहऱ्याला पांढरा रंग लावशील?'
शाळा सुरू झाल्यानंतर चार वर्षांच्या लिऑननं आपल्या आईला त्याचा चेहरा पांढऱ्या रंगानं रंगवण्याची विनंती केली. त्याला गोरं व्हायचंय असं त्यानं त्याची आई अॅलिसनला सांगितलं.
वर्णद्वेष किंवा वर्णभेदाविषयी कुठलीही चर्चा आपल्या मुलाच्या समोर अद्याप झाली नाही. तो शाळेत नुकताच जायला लागलाय, मग त्याला असं पांढरं क्रीम फासून गोरं व्हावं असं का वाटलं? ब्राऊन स्किन त्याला का नकोशी झाली? याचं अॅलिसन यांना नवल वाटलं.
हा विषय त्यांनी पालक म्हणून कसा हाताळला... पाहा व्हीडिओ
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)