पाहा व्हीडिओः सायकलमुळेच ते आज 98 व्या वर्षीही ठणठणीत आहेत
सांगली जिल्ह्यातले रामपूरचे गणपती यादव दररोज किमान दोन किमी सायकल चालवतात. 98 व्या वर्षीही ते अगदी ठणठणीत आहेत.
क्रांतिसिंह नाना पाटलांच्या “प्रति सरकार”मध्ये गणपती यादव यांचा सहभाग होता.
"आम्ही इंग्रजांच्या काळात कुठल्याही कार्यक्रमात जायचं झाल्यास सायकलवरून जायचो. स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेला आम्ही ठिकठिकाणी जायचो.
इंग्रजांना चाड होऊन भूमिगताला पकडून देणाऱ्या माणसाला आम्ही हुडकून काढून मार द्यायचो, पत्री लावायचो," अशी आठवण ते सांगतात.
शूटींग आणि एडिटींग - राहुल रणसुभे
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)