गडहिंग्लजच्या पंचक्रोशीत चालतो शांताबाईंचा वस्तरा
गडहिंग्लजच्या पंचक्रोशीत शांताबाई आजीचा वस्तरा फेमस आहे. दोन दशकांपूर्वी त्यांनी पुरुषांच्या या मक्तेदारीला सुरुंग लावत नाभिक व्यवसाय सुरू केला.
गडहिंग्लज तालुक्यात हुसूर सासगिरी गावात नाभिक नाही म्हणून शांताबाईंचे पती या गावात व्यवसायाची संधी शोधत आले. मात्र काही वर्षांतच त्यांच्या पतीचं हृदयविकारानं निधन झालं.
तेव्हा शांताबाईंच्या पदरात चार मुली होत्या. शांताबाईंना काय करावं कळेना. जोगवा मागूनसुद्धा त्यांनी दिवस काढले. परंतु असं किती दिवस जगणार हा विचार करून शांताबाईंनी हातात वस्तरा घ्यायचा धाडसी निर्णय घेतला.
शूटिंग - राहूल रणसुभे
एडिटिंग - शरद बढे
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)