'मी एक भारतीय मुस्लीम आहे, मी पाकिस्तानकडून का खेळणार?'
भारतातील सुमारे 40 कोटी नागरिक दलित अथवा मुस्लीम समाजातील आहेत. इतक्या मोठ्या संख्येने असूनही त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना आजही घडत आहेत, हे वास्तव आहे. म्हणून या समाजांच्या समस्या सर्वांसमोर आणण्यासाठी ही बीबीसीची आठ लेखांची एक विशेष मालिका आहे.

माझ्यासोबत कोणीच खेळत नसायचं, मुलं मला मुसलमान म्हणून चिडवायचे, म्हणायचे हा बिफ खातो, याच्या घरचे लोक दंगली करतात.
शाळेत शिकणाऱ्या काही मुस्लीम मुलांसोबत बीबीसीने संवाद साधला. त्यांच्यासोबत बोलल्यावर असं जाणवलं त्यांना शाळेत इतर मुलं बरोबरीची वागणूक देत नाहीत.
त्यांना "पाकिस्तानी" म्हणून हिणवलं जातं. या मुलांसोबत खेळायला इतर मुलं तयार होत नाही. शाळेतील इतर मुलं मुस्लीम मुलांबरोबर जेवण करण्यासही तयार नसतात अशी धक्कादायक माहिती समोर आली.
बीबीसीतर्फे, सीटू तिवारी आणि समीरात्मज मिश्र यांनी लहान मुलांबरोबर केलेल्या संवादावर आधारित.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)