पाहा व्हीडिओ : ‘मेवातमधले मुस्लीम भारतीय नाहीत का?’
भारतातील सुमारे 40 कोटी नागरिक दलित अथवा मुस्लीम समाजातील आहेत. इतक्या मोठ्या संख्येने असूनही त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना आजही घडत आहेत, हे वास्तव आहे. म्हणून या समाजांच्या समस्या सर्वांसमोर आणण्यासाठी ही बीबीसीची आठ लेखांची एक विशेष मालिका आहे.

देशभरातल्या 20 सर्वांत जास्त मागासलेल्या जिल्ह्यांपैकी 11 जिल्हे मुस्लीमबहुल आहेत. त्यापैकी एक मेवात आहे.
हरियाणातला हा जिल्हा देशातला सर्वांत मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. बेरोजगारी, निरक्षरता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दुरवस्थेमुळे नीती आयोगानं याला सर्वांत मागास जिल्हा ठरवलं आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)