पाहा व्हीडिओ : शाही विवाह सोहळ्याचे मुंबईच्या डबेवाल्यांनी सांगितले अनुभव

प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन यांचा शाही विवाह सोहळा १९ मे रोजी लंडनला होणार आहे. यासाठी खास शुभेच्छा पाठवल्यात मुंबईच्या डबेवाल्यांनी!

मुंबईच्या डबेवाल्यांचं आणि लंडनच्या राजघराण्याचं आपुलकीचं नातं आहे. कारण २००५ ला प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला यांचा विवाहसोहळा झाला होता, त्यासाठी या डबेवाल्यांना शाही निमंत्रण आलं होतं.

तेव्हा या लग्नाकरिता मुंबईहून दोन डबेवाल्यांना लंडनला पाठवण्यात आलं होतं. यापैकी एक होते सोपान लक्ष्मण मरे. त्यांनी त्या वेळच्या शाही विवाह सोहळ्याचे अनुभव बीबीसी मराठीला सांगितले.

शूट - राहुल रणसुभे, एडिट - शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)