पाहा व्हीडिओ: पार्टनरने हल्ला केला तर धावून येतील हे कुत्रे
जर तुमच्यावर कुणी हल्ला केला आणि ती व्यक्ती कितीही जवळची असली तरी तुमच्या कुत्र्याने त्याचा चावा घेऊन तुम्हाला वाचवलं तर...?
महिलांवर जोडीदाराकडून होणाऱ्या अशाच अत्याचारांचा सामना करण्यासाठी कुत्र्यांची मदत घेतली जात आहे. कुठे होतोय हा प्रयोग?
स्पेनमध्ये दर महिन्याला सरासरी चार महिलांची त्यांच्या जोडीदारांकडून हत्या होते आहे. जोडीदाराच्या अत्याचाराला बळी पडणाऱ्या महिलांच्या मदतीसाठी स्पेनमध्ये कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
आतापर्यंत या उपक्रमात 40 महिलांनी सहभाग घेतला आहे. त्याचा त्यांना फायदा होत आहे.
गेमा अबाद तर म्हणतात की, आता आपल्याला कोणीही त्रास देऊ शकणार नाही, ही जाणीव छान आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)