काय सांगताय काय? इंग्लंडच्या कॉलेजमध्ये आता हिंग्लिश शिकवतात!

व्हीडिओ कॅप्शन, हिंग्लिश : इंग्लडमध्ये पहिल्यांदाच शिकवली जात आहे एक नवीन भाषा

आपण किती सहजपणे कधी मराठी तर कधी हिंदी बोलताना इंग्लिश शब्द वापरतो ना? Guess what, आता या भाषेचे कोर्सेस इंग्लंडमध्ये सुरू झाले आहेत.

पोर्ट्समथ कॉलेज हे असा अभ्यासक्रम सुरू करणारं UKतलं पहिलं कॉलेज आहे. इथले शिक्षक आणि विद्यार्थी सांगतात कशी ही त्यांच्यासाठी खरोखरच एक अनोखी संधी आहे.

आणि का नसेल? भारत आज जगातली सातवी सर्वांत मोठी इकॉनॉमी आहे. जसे भारतातले तरुण जगभरात देशाचं नाव करत आहेत, अगदी तसंच जगभरातल्या तरुणांना भारतातल्या संधी खुणावत आहेत. खऱ्या अर्थाने ग्लोबल कदाचित याला म्हणतात, नाही का?

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)