You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा व्हीडिओ: अबब! आता बॅटरीवर उडणारं विमानही आलंय!
सध्या आपण इलेक्ट्रिक कार आणि इ-बाईकच्या स्वारीची तयारी करत आहोतच. कुणी केलीही असेल बहुदा. पण आता आपले सीटबेल्ट घट्ट बांधा - कारण इलेक्ट्रिक विमान आता टेकऑफ करणार आहे.
हो! हे खरंय! या विमानाचं नाव eFusion आहे. एक वेळच्या चार्जिंगमध्ये हे विमान एक तास उडू शकतं.
टू-सीटर विमानांसाठी बॅटरीचा पर्याय वापरण्यावर संशोधन सुरू आहे. सध्या काही कंपन्या या क्षेत्रात काम करत आहेत. जसं एखादी कार किंवा स्कूटर बॅटरीवर चालते त्या प्रमाणेच विमानं देखील भविष्यात बॅटरीवर चालतील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
"सध्या बॅटरीच्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यास मोठ्या कंपन्या उत्सुक आहेत," असं क्रेनफिल्ड विद्यापीठाचे संचालक प्रा. आयन ग्रे यांनी सांगितलं.
हे भविष्यातलं वाहन आहे, असं म्हटलं जात आहे.