पाहा व्हीडिओ : रस्त्यावर धावणारी ही कार उडतेसुद्धा!

टेराफ्युजिया कंपनीनं TF-X नावाचं एक असं वाहन बनवलं आहे जे जमिनीवर धावू शकतं आणि उडूही शकतं. हे भविष्यातलं वाहन आहे असं कंपनीच्या मुख्याधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. ही कार रस्त्यावर धावते. जर तुम्हाला उडावसं वाटलं तर कारचे पंख उघडले की भरारी घेण्यास सज्ज होते. वैशिष्ट्य म्हणजे या कारच्या लॅंडिंगसाठी आणि उड्डाणासाठी धावपट्टीची गरज नाही.

2019मध्ये TF-X बाजारात येऊ शकतं.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)