पाहा व्हीडीओ : जपानमधला हा ज्वालामुखी ओकतोय राख!

व्हीडिओ कॅप्शन, माऊंट शीन्मोअयडेके ओकतोय राख

एखाद्या ज्वालामुखीचा जेव्हा उद्रेक होतो तेव्हा त्यातून निघणारी राख, लावा, आग भयावह असते. या उद्रेकाची दृश्यं दुरून पाहताना कुणाचा थरकाप उडतो तर कुणाला मजाही वाटू शकते.

दक्षिण जपानमधील प्रसिद्ध माऊंट शीन्मोअयडेकेच्या ज्वालामुखीत भव्य स्फोट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या यातून राखेचे ढग निघत आहेत.

ज्वालामुखीची ही दृश्य पाहून तुम्हाला कसं वाटतं सांगा.

जेम्स बाँडच्या You Only Live Twice या सिनेमात हा ज्वालामुखी दाखवण्यात आला आहे.

2011 मध्येही या ज्वालामुखीचा स्फोट झाला होता. तेव्हा तर 8 किमी दूर असलेल्या घरांच्या काचा फुटल्या होता.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)