पाहा व्हीडिओ : उसाच्या शेतात राहणारे बिबटे जेव्हा गावांमध्ये शिकारीला येतात...
महाराष्ट्राच्या काही भागात बिबट्यांनी उसाच्या शेतीलाच आपला अधिवास बनवलं आहे. उसात वावरणाऱ्या बिबट्यांची ही तिसरी पिढी ज्यांना दुसरं जंगल माहीतच नाही.
बिबट्याच्या दोन पिढ्या या उसात वाढल्या आहेत. उसामधील बिबट्याची प्रजाती, अशी नवीन प्रजातीच उदयास आली आहे. आजूबाजूला सहजपणे भक्ष मिळत असल्यानं दिवसेंदिवस उसामध्ये राहून पिढी वाढवण्याकडे त्यांचा कल वाढला आहे, असं गावाकडचे पोलीस सांगतात.
पण जंगलं कमी झाल्याने बिबटे गाव परिसरात आश्रयाला आले. आणि त्यातूनच बिबटे आणि मानवात संघर्ष उडायला लागला.
माणसांनी बिबट्यासोबतचं सहजीवन स्वीकारण्याची वेळ आली आहे का?
वाचा पूर्ण बातमी इथे - बिबट्यांनी शोधलं नवीन घर कारण...
शूटिंग - प्रविण ठाकरे
एडिटिंग आणि निर्मिती - निरंजन छानवाल
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)