पाहा व्हीडिओ : लष्करी सराव म्हणून हे सैनिक पितात सापाचं रक्त

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : लष्करी सराव म्हणून हे सैनिक सापाचं रक्त प्यायले

लष्करी सरावाचा भाग म्हणून अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सैनिकांनी साप, विंचू, कोळी पकडून ते खाण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. या प्रशिक्षणात ते सापाचं रक्तही प्यायले आहेत.

या दोन्ही देशाच्या सैनिकांना थायलंडच्या सैन्य अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण दिलं आहे. प्रतिकूल परिस्थितीत अन्न नसताना आपल्या आजूबाजूला असलेल्या अशा प्राण्यांना खाऊन जगता यावं हा या सरावाचा उद्देश असल्याचं ते सांगतात. एका लष्करी सरावाचा हा भाग असल्याचं अमेरिकी सैनिकानं सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)