पाहा व्हीडिओ : आपल्या 'सपेरा' नृत्याला जगभरात पोहोचवणारी नर्तिका!
राजस्थानातील गुलाबो सपेरा यांची ही कथा. त्या ज्या समजात जन्मल्या त्या समाजात मुलींना काहीच स्थान नव्हतं.
जन्मानंतर त्यांना लगेचच मरण्यासाठी गाडून टाकण्यात आलं होतं. त्यांच्या आईनं आणि मावशीनं त्यांना वाचवलं. लहानपणापासून सापांसमवेत खेळत वाढलेल्या गुलाबोंनी सपेरा नृत्य या नव्या नृत्यप्रकारला जन्म दिला. त्यांच्या यशामुळे या समजाचा स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोनही बदलला. हेच माझं मोठ यश आहे, असं त्या म्हणतात.
रिपोर्ट - सुमिरन प्रीत कौर
शूटिंग आणि एडिटिंग - मनीष जैन
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)