You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

अमेरिका निवडणूक निकाल : कोण होणार राष्ट्राध्यक्ष?

डोनाल्ड ट्रंप व्हाईट हाऊसमध्ये आणखी 4 वर्षं राहणार की नाही हे लवकरच कळणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीत 'स्विंग स्टेट्स'ची भूमिका ही महत्त्वाची समजली जाते.

लाईव्ह कव्हरेज

  1. डोनाल्ड ट्रंप मोडणार परंपरा, जो बायडन यांच्या शपथविधीला राहणार गैरहजर

  2. मिशिगनमध्ये बायडन यांची आगेकूच

    मिशिगन या महत्त्वपूर्ण राज्यात बायडन 0.2 टक्के मतांनी आघाडीवर आहेत.

    आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार बायडन यांना 49.3 तर ट्रंप यांना 49.1 टक्के मते मिळाली आहेत. निवडणूक निकालांमध्ये अॅरिझोना, जॉर्जिया, व्हिस्कॉन्सिन, मिशिगन आणि पेन्सिलवेनिया या राज्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यात अॅरिझोना आणि व्हिस्कॉन्सिन राज्यात बायडन यांना आघाडी मिळाली आहे.

  3. निकालाचे चित्र अद्याप स्पष्ट नाही

    अमेरिकेतल्या निवडणुकीतून अद्याप कोणताही ठोस निकाल जाहीर झालेला नाही. शेवटची माहिती येईपर्यंत 50 पैकी 41 राज्यांमधील निकाल स्पष्ट झाले होते.

  4. आज दिवसभरात काय काय घडलं?, अमेरिकेतल्या निवडणुकांसह सर्व घडामोडी

  5. ‘आताच कोणाला विजय झाल्याचा दावा करता येणार नाही’

    अमेरिकेतील निवडणुकांबाबत युरोपमधून कोणतीही विशेष प्रतिक्रिया आतापर्यंत आली नव्हती. मात्र युरोपियन महासंघाचे मुख्य राजनयिक अधिकारी जोसेफ बोरेल यांनी आपलं मत मांडलं आहे.

    या अटीतटीच्या निवडणुकीत प्रत्येक मताची मोजणी गरजेची आहे. आताच कोणीही विजयाचा दावा करू शकत नाही.

    तर स्लोवेनियाचे पंतप्रधान जनेज जनसा यांनी ट्रंप दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत हे स्पष्ट झालं आहे असं ट्वीट केलं आहे

  6. रशियन वाहिनी म्हणते- अमेरिका निवडणुका म्हणजे ‘वेडेपणा’

    अमेरिकेत कोण राष्ट्राध्यक्ष होणार यापेक्षा रशियातील एका टीव्हीने वेगळ्याच गोष्टीकडे लक्षवेधले आहे. रोसिया 24 या सरकारी वाहिनीने अमेरिकेतील रस्त्यांवर ओरडत फिरणाऱ्या, किंचाळणाऱ्या लोकांचे व्हीडिओ प्रसारित केले. अमेरिकन निवडणुका म्हणजे वेडेपणा आहे असं त्यांनी संबोधलं आहे. अमेरिकेत अराजक माजलं असून त्यांची लोकशाही अपयशी ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं.

  7. अमेरिका निवडणुकीचे निकाल अजून जाहीर का झालेले नाहीत?

  8. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक निकालांच्या या आहेत तीन शक्यता

    अखेर तो क्षण आलाय…ज्या क्षणाची आपण उत्सुकतेने वाट पहात होतो. हे सर्व ऑलिंम्पिक मॅरेथॉनसारखं वाटतंय..जेव्हा खेळाडू शेवटचे 400 मीटर धावण्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश करतात..शरीर खूप थकलेलं असतं..स्नायू दुखत असतात..पण, शेवटचे काही मीटर्स वेगाने धावण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा असतो.

    यंदाचा निवडणूक प्रचार विलक्षण, काही प्रकारे अस्वस्थ करणारा, ज्याचा आपण कधीच विचारही केला नसेल असा होता. यापुढे काय होणार, याचं उत्तर शोधत असताना सर्व गोष्टी माझ्यासमोर हळूहळू स्पष्ट आहेत.सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा- या आहेत तीन शक्यता

  9. मतदार काय म्हणतात? घोटाळ्याच्या आरोपाने मला वाईट वाटलं

    आमना नावाच्या या मतदारांनी बीबीसी रेडिओ लाइव्ह 5 शी बोलताना सांगितलं, ट्रंप यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचं म्हटल्यावर त्यांना दुःख झालं.

    त्या म्हणाल्या, “मी परदेशातून माझं मत पाठवायचं ठरवलं होतं. पण ट्रंप यांच्या वक्तव्यामुळे दुःख झालं. कोणीही जिंकलं तरी एकात्मता आणि शांतता येण्यालाठी आपण सुरूवात करू अशी मला आशा वाटते. पण या विधानामुळे ती अपेक्षा पूर्ण होईल असे वाटत नाही.”

  10. आज थोडं विषयांतर....

  11. आतापर्यंत हाती आलेले निकाल

  12. कधी ठरणार अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष?

  13. ताजी आकडेवारी

  14. ट्रंप यांच्यासाठी अटीतटीची राजकीय लढाई

    कोरोना विषाणू उद्भवण्यापूर्वी डोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी राजकीय चिन्हं पूरक होती. ते महाभियोग खटल्यातून मोकळे झाले होते. राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांना मिळणारा कौल सर्वाधिक उच्चांकी गेला होता.

    अर्थव्यवस्था शक्तिशाली झाल्याची बढाई मारणं त्यांना शक्य होतं आणि सत्तारूढ असण्याचे लाभ घेणंही त्यांना शक्य होतं- पहिल्यांदाच निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्षाच्या बाबतीत हे दोन घटक जुळून येत असतील, तर त्या आणखी चार वर्षांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता अधिक ठळक होते.

    रिअॅलिटी शोमध्ये जाऊन आलेली (ट्रम्प यांच्यासारखी) व्यक्ती अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक कधीच जिंकू शकणार नाही, अशा भ्रामक समजुतीवर 2016 सालच्या निवडणुकीचं वार्तांकन आधारलेलं होतं. या वर्षाच्या सुरुवातीला, डोनाल्ड ट्रम्प हरणारच नाहीत या समजुतीची झालर वार्तांकनाला होती.सविस्तर वृत्त वाचण्याासाठी क्लिक करा- ट्रंप यांच्यासाठी अटीतटीची राजकीय लढाई

  15. अमेरिकेत विविध ठिकाणी मतमोजणी

  16. विस्कॉन्सिनमध्ये बायडन यांची आघाडी

    अमेरिकेच्या निवडणुकीत सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विस्कॉन्सिन राज्यात बायडन यांनी 0.3 टक्क्याची आघाडी घेतली आहे. गेल्या निवडणुकीत इथं ट्रंप यांना मताधिक्य मिळालं होतं.

    इथल्या 89 टक्के मतांची मोजणी झाली आहे. ट्रंप यांच्या बाजूने 15,66,844 तर बायडन यांच्या बाजूने 15,78,433 मतं पडली आहेत.

    टक्केवारीत सांगायचं झालं तर ट्रंप यांना 49.0 तर बायडन यांना 49.3 टक्के मतं मिळाली आहेत.

  17. अमेरिकेत निवडणुकीच्या दिवसाची काही क्षणचित्रं...

    अमेरिकाच नाही, अख्खं जग या निकालाकडे डोळे लावून बसलं आहे. पण अपेक्षेप्रमाणेच निकाल लांबणीवर पडण्याची चिन्हं आहेत. यंदा अमेरिकेत दहा कोटींहून अधिक लोकांनी पोस्टानं मतदान केलं आहे. त्यातली अनेक मतं अजून मोजली जाणं बाकी आहे. त्यामुळे निकाल येण्यासाठी कदाचित काही दिवसही लागू शकतात.

  18. अमेरिका निवडणूकीत नेमकं काय होत आहे?

    ट्रंप आणि बायडन यांच्यापैकी कुणालाही अजून स्पष्ट बहुमत मिळालेलं नही. निकाल लांबणीवर पडत असून अंतिम आकडेवारी कळेपर्यंत काही दिवस लागतील अशी शक्यता व्यक्त होते आहे.

  19. डोनाल्ड ट्रंप निवडणूक प्रक्रियेविरुद्ध सुप्रीम कोर्टात का चाललेत?

    अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची मतमोजणी पूर्ण होण्याआधीच डोनाल्ड ट्रंप निवडणूक प्रक्रियेविरुद्ध सुप्रीम कोर्टात का चाललेत?

  20. यावेळेस पोस्टाने पाठवलेली मत वादात अडकतील- बॅरी रिचर्ड्स

    अमेरिकेतील प्रसिद्ध वकील बॅरि रिचर्ड्स यांनी यावेळेस कायदेशीर वादात पोस्टल मतं अडकतील अशी शक्यता वर्तवली. ते 2000 साली झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीतील न्यायालयीन वादात बुश यांचे वकील होते.

    ते म्हणाले, “हे प्रकरण अनेक अर्थानी वेगळं आहे. तेव्हा फ्लोरिडामधील मतपत्रिकांच्या डिझाइनमध्ये गोंधळ आणि कायदेशीर चुका झाल्या होत्या. त्या आधारे खटला झाला होता. जोपर्यंत ते स्वीकारणं अत्यंत आवश्यक होत नाही तोपर्यंत यावेळेस सर्वोच्च न्यायालय इतक्या सहजतेने हे प्रकरण स्वीकारेल असं वाटत नाही.”