पवार साहेबांच्या छत्रछायेखाली मी तयार झालो. पवारसाहेबांबरोबर मलाही लोकांनी साथ दिली. पुलोदला लोकांनी पाठिंबा दिला. 1980 साली पुलोदचं सरकार गेलं. तेव्हा सगळे आमदार काँग्रेसमध्ये आले तर सरकार कायम ठेवू असं इंदिरा गांधी यांनी सांगितलं होतं. पण त्यांना नकार देण्यात आला होता. त्यानंतर अनेक पक्ष स्थापन झाले. पुन्हा साहेब विरोधी पक्षात गेले. आजवरचा इतिहास पाहाता लोकांना करिश्माई नेता हवा असतो. पण प्रत्येकाचा एक काळ असतो. 25 ते 75 या वयाच्या टप्प्यात आपण चांगलं काम करू शकतो. प्रत्येक 25 वर्षांनी नवी पिढी येत असते. 'आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो ही आमची चूक आहे का?' असा अजित पवारांचा शरद पवारांवर थेट वार केला आहे.
1986 साली नेत्यांनी समाजवादी काँग्रेस ही काँग्रेसमध्ये विलिन केली. 1988 साली साहेबांना मुख्यमंत्रीपद मिळालं. 1988-90 काँग्रेसमध्ये राहिलो. 1991ला मी बारामतीतून खासदार झालो. प्रफुल्ल पटेलही तेव्हा खासदार झाले. दुर्दैवान राजीव गांधींचे निधन झाले. 1991 पासून साहेब पुन्हा केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून तिकडे गेले. बॉम्बस्फोटानंतर ते पुन्हा राज्यात आले.
1995 साली राज्यातलं आपलं सरकार गेलं. 1999 साली काँग्रेस एकत्र होती. पण तेव्हा सोनिया गांधी परदेशी आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं. 1999 साली आपण बाहेर पडलो.नंतर सरकार आल्यावर अनेकजण मंत्री झाले. मला फक्त सात जिल्ह्यांचं मंत्रिपद मिळालं. मी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. कोणीही कार्यकर्ता आलं तर त्याचं काम करणे एवढंच ध्येय ठेवलं. पहाटेपासून रात्रीपर्यंत काम करतो.2004 साली आपले 71 आमदार आले, काँग्रेसचे 69 आले. तेव्हा मी लहान कार्यकर्ता होतो. तेव्हा सोनिया गांधींनी विलासराव देशमुखांना आता राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल असं सांगितलं होतं. पण चार मंत्रिपदं जास्त घेऊन मुख्यमंत्रीपदाची संधी आपण देऊन टाकली. ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री दिसला असता.
2014 साली नेत्यांनी भाजपाला बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच आम्हाला देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीलाही उपस्थित राहायला सांगितले होते. तेव्हा आम्हाला का जायला सांगितलं होतं? 2017 सालीही वर्षा बंगल्यावर पाठिंब्यासाठी चर्चा झाली होती. तेव्हाही भाजपाच्या नेत्यांशी चर्चा झाली होती. मंत्रिपदाची, पालकमंत्रीपदांचीही चर्चा झाली होती. मी हे खरं सांगतो, खोटं बोललो तर पवारांची औलाद नाही. तेव्हा भाजपाने आम्ही 25 वर्षांच्या मित्रपक्षाला सोडणार नाही असं सांगितलं. तेव्हा आमच्या वरिष्ठांनी शिवसेना जातीयवादी आहे म्हणून चालणार नाही असं सांगितलं.
2019 सालीही भाजपाबरोबर बैठका झाल्या मात्र अचानक तो निर्णय मागे घेऊन शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला गेला. 2017 साली शिवसेना जातीयवादी ठरवून त्यांच्याबरोबर जाऊ नये असं म्हटलं होतं मग 2 वर्षात अचानक काय बदल झाला की त्यामुळे शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय झाला? उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मला उपमुख्यमंत्री केलं. मी कधीही हूं की चू केलं नाही. कोरोना काळात हलगर्जीपणा दाखवला नाही.
2022 साली भाजपाबरोबर सरकारमध्ये जाण्याचा निर्णय आमदारांनी घेतला होता. मात्र तो रद्द केला गेला. माझी प्रतिमा उगाच वाईट केली जाते.
तुम्ही कधी थांबणार आहात की नाही, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या ना, राजीनामा द्यायचा होता तर मग तुम्ही का दिलात? आमच्यात सरकार चालवायची धमक नाही का? राज्यातल्या प्रमुख नेत्यांना माझं कुठंतरी नाव येत असेल की, मग आम्हाला आशीर्वाद का नाही? असा कसला हट्ट आहे?