मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कोणीही दिवास्वप्न पाहू नये-उदय सामंत
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, ती अफवा आहे. आम्ही अजिबात नाराज नाही असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.
लाईव्ह कव्हरेज
ओंकार करंबेळकर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कोणीही दिवास्वप्न पाहू नये-उदय सामंत
'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्रिपदी राहतील. विकासाच्या मुद्यावर तीन पक्ष एकत्र आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कोणीही दिवास्वप्न पाहू नये', असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीनंतर ते बोलत होते. पुढची आमदारकीची, लोकसभेची निवडणूक महायुती एकत्र लढवणार असंही सामंत यांनी सांगितलं.
'मुख्यमंत्री राजीनामा देणार नाहीत. पक्षात कोणी उरलं नाही ते अशा बातम्या पसरवतात. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्न उद्भवत नाही. अजित पवार यांच्या येण्याने आमचा कोणीही आमदार नाराज नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री घेतील', असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीनंतर नेमकं कोण काय म्हणालं? पाहा बीबीसी मराठीच्या फेसबुक लाईव्हवर.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वर्षा बंगल्यावर बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकारी निवासस्थान वर्षा याठिकाणी शिवसेनेचे आमदार आणि खासदार यांची एक बैठक संध्याकाळी घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरु होती.
अजित पवार यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांमध्ये त्याबाबत नाराजी दिसून आली होती.
शिवसेना नेते भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांनी यावर प्रश्न उपस्थित केले होते. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या बैठका झाल्या.
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांनीही एक बैठक घेतली. या बैठकीत काय निर्णय झाला, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचा दावा
अजित पवारांनी २ जूनला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी अजित पवारांनी 30 जूनला 40 आमदारांच्या सह्यांचं एक पत्र घेतलं. हेच पत्र अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं आहे.
5 जुलै रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं निवडणूक चिन्ह घड्याळ यावर दावा करणारं पत्र प्राप्त झालं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची नेमणूक झाल्याचं पत्र निवडणूक आयोगाला प्राप्त झालं आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांनी शपथ घेण्याच्या दोन दिवस आधीच ही याचिका अजित पवार यांच्या वतीने निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. तसेच या याचिकेसोबत दिलेल्या पत्रात ४० आमदारांच्या सह्या असल्याचं समोर आलं आहे. तसेच अजितदादांच्या ठरावात अजित पवारांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, असा उल्लेखही या याचिकेत करण्यात आला आहे.
आव्हाडांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला- किसन कथोरे
जितेंद्र आव्हाडांमुळे ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते सोडून गेल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. त्यामध्ये त्यांनी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचंसुद्धा नाव घेतलं. जितेंद्र आव्हाडांमुळे ठाण्यातल्या राष्ट्रवादीत घाणेरडं राजकारण सुरू झालं होतं. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच मी पक्ष सोडला हे खरं आहे असं किसन कथोरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं आहे.
"शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यापासून मी त्यांच्याबरोबर होतो. त्यावेळी मीसुद्धा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पण, जिल्ह्यातल्या घाणेरड्या राजकारणामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली. मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर ठाणे जिल्ह्यातून पक्ष मागेमागे होत गेला,” असं कथोरे यांनी म्हटलं आहे.
अजित पवार गटात कोण-कोण?
अजित पवार गटातील आमदार हॉटेल ताज लँड्समध्ये
अजित पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीनंतर त्यांचे समर्थक आमदार हॉटेल ताज लँड्समध्ये दाखल झाले आहेत.
बैठकीनंतर सर्व आमदारांना एका बसमध्ये बसवून हॉटेलकडे नेण्यात आलं. हॉटेलमध्ये सगळ्या आमदारांची एक बैठक पार पडली.
यानंतर, आता या आमदारांना एकत्रित ठेवण्यात येणार असून काही वेळ त्यांना हॉटेलमध्येच वास्तव्य करावं लागणार आहे.
शिवसेना आणि भाजपाच्या हिंदुत्वात फरक आहे- शरद पवारांचा भाजपावर घणाघात
शिवसेनेचं हिंदुत्व अठरापगड़ जातीचं आहे. भाजपाचं हिंदुत्व विद्वेष वाढवणारं आहे. माणसामाणसात विभाजन करणारं हिंदुत्व भाजपाचं आहे. त्यामुळे दोन पक्षात फरक आहे.
अकोला, कोल्हापूर दंगलींमागे कोण होतं हे सर्वांना माहिती आहे. जिथं आपली सत्ता नाही तिथं विद्वेष वाढवून आपल्याला काही फायदा होतो का पाहायचं ही त्यांची वृत्ती आहे.यापेक्षा महागाई, बेकारी, महिलांवरचे हल्ले हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. मुली पळवण्याची आकडेवारी आली आहे. सहा महिन्यात 4 हजारांपेक्षा जास्त मुली पळवल्या गेल्या जिथं मुलींना संरक्षण मिळत नाही त्यांच्याबरोबर आम्ही काय राज्य करणार. त्यामुळे या लोकांच्या भरवशावर राहून उपयोगाचं नाही. त्यांना सत्तेतून बाजूला करणं हा एककलमी कार्यक्रम हाती घ्यायला पाहिजे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
आपलं नाणं चालणार नाही हे त्यांना माहितीये- शरद पवार
आपलं नाणं चालणार नाही हे त्यांना माहितीये, असा थेट आरोप शरद पवार यांनी त्यांच्या पक्षात बंड करणाऱ्यांवर केला आहे. त्यांचं नाणं खणकन वाजत नाही हे त्यांना माहितीये म्हणून माझे फोटो वापरले जातात. सगळीकडे माझेच फोटो वापरले जात आहेत. पांडुरंग, गुरू म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष झाल्याचं सांगत आहेत. ही गंमतीची गोष्ट आहे.छगन भुजबळ तुरुंगात जाऊन आले तरीही त्यांना परत संधी दिली, त्यांना मंत्रिपदाचीही संधी दिली. परवाही त्यांनी थेट शपथ घेतली. माझी माणसं आहेत, ठीक आहे, बघून घेतो.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतरंगात त्या पक्षाचे विचार असतात तोपर्यंत काहीही होत नाही. पक्षाचं चिन्ह जाणार नाही पण गेलं तरी त्याचा परिणाम होत नसतो.
गेल्या 24 वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसने नेते, कार्यकर्त्यांची फळी उभी केली. विधानसभा, मंत्रिमंडळात, लोकसभेत अनेकांना काम करता आलं असतं. अनेक नेते नवीन तयार केले. महाराष्ट्राचा चेहरा बदलायचं मनात होतं. शेवटच्या माणसाच्या आयुष्यात प्रकाश कसा येईल यासाठी प्रयत्न केले. त्या कामात तुमच्या कष्टानं यश आलं
आता पुढं जायचंय, संकटं खुप आहेत. ज्यांची वैचारीक भूमिका देशाच्या हितात नाही त्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत. त्यांच्यापुढे त्यांच्या सहकाऱ्यांनासुद्धा त्यांच्या मनातल्या कल्पना मांडण्याला मर्यादा आहेत. मी केंद्र सरकारमध्ये अनेकदा काम केलं आहे. मनमोहन सिंग, पी. व्ही नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये काम केलं. विरोधीपक्षनेता म्हणून काम केलं. यासर्वांच्या कामाची पद्धत पाहिली आहे. लोकांची भावना वेगळी असेल तर सुसंवाद करण्याची रित होती. आज चित्र वेगळं आहे. संवाद संपला आहे. विरोधकांशी संवाद पाहिजे. मीही 4 वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. मी निर्णय घेतला की सामान्य लोकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संवाद ठेवायचो. अयोग्य असेल तर दुरुस्त करण्याची मानसिकता पाहिजे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
आज आम्ही लोकांमध्ये आहोत. तिथं लोकांची दुःखं समजतात. पण राज्यकर्त्यांचा संवाद नसेल तर ती समजण्यात मर्यादा येते. आज सर्वत्र अस्वस्थता आहे. दुसरीकडे आम्ही लोकांनी लोकशाही टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो संवाद चालू होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. जे सत्ताधारी पक्षात नाहीत त्या सर्वांना संघटित करायचे प्रयत्न केले. बिहारमध्ये अनेक पक्षांचे नेते भेटलो, नंतर बंगलोरला पुन्हा भेटणार आहोत. तिथं व्यक्तिगत विचार मांडत नाही, देशाच्या समस्यांवर बोलतो. यामुळे सत्ताधाऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली, पंतप्रधानांनी 8 दिवसांपूर्वी काँग्रेसने इतक्या लाख कोटींची, राष्ट्रवादीने 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचं सांगितलं. तेव्हा राज्य सहकारी बँक आणि पाटबंधारे खात्याचा उल्लेख केला.पंतप्रधान बारामतीत आले तेव्हा पवारसाहेबांचं बोट धरुन प्रशासन शिकलो असं सांगितलं नंतर निवडणुकीत मात्र माझ्यावर आरोप केले. पण नुस्ते आरोप करुन चालणार नाही, सत्य बाहेर येण्य़ासाठी कारवाई केले पाहिजे. ती धमक त्यांनी दाखवली नाही. देशाचा नेता म्हणून बोलताना त्यांनी सभ्यता, मर्यादा पाळली पाहिजे. त्या पाळल्या जात नाहीत.
राष्ट्रवादी पक्ष एवढा भ्रष्ट वाटतो मग मंत्रिमंडळात या पक्षाला का घेतलंत.
2019 ला बडवे आडवे आले नाही का?- जयंत पाटील
2019 साली उद्धव ठाकरे यांनी पहिल्या शपथविधीला दोन नावं मागितली तेव्हा साहेबांनी पहिलं नाव छगन भुजबळांचं नाव दिलं. तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का? असा प्रश्न जयंत पाटील यांनी छगन भुजबळांना विचारला आहे.
शरद पवार नावाचा झंझावात महाराष्ट्रात फिरायला लागला तर काय होईल याची चुणूक सातारा आणि कऱ्हाडला तुम्ही पाहिली आहे. आम्ही पावर साहेबांच्या शब्दापलिकडे जात नाही यात माझी काय चूक आहे?
अजित पवार आणि त्यांच्या गटाचे आमदार बसमध्ये बसून अज्ञातस्थळी निघाले
वय हा फक्त आकडा आहे- सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे यांनी हा बाप माझा एकटीचा नाही, वय हा फक्त आकडा आहे. आजपासून आपली लढाई सुरू. आपण भाजपाच्याविरोधात लढायचं आहे. सत्तेनं सुख मिळत नाही. भाजपा हा सर्वात भ्रष्ट पक्ष आहे. भाजपाच्या विरोधात रस्त्यावर उतरा. 8-9 खुर्च्या मोकळ्या झाल्या आहेत. तिथं नव्या लोकांना जागा मिळेल. पक्षात आपण 33 टक्के महिलांना संधी द्यावी अशी मी पवारसाहेबांना विनंती करते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर अजित पवारांचा दावा- एएनआय वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे दावा केला आहे. तसेच याबद्दल 9 आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई व्हावी असं कॅव्हेट जयंत पाटील यांनी सादर केल्याचं सूत्रांच्य़ा हवाल्यानं एएनआय वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
आव्हाडांमुळे अनेक नेते पक्ष सोडून गेले- अजित पवार
जितेंद्र आव्हाडांमुळे गणेश नाईक, संदीप नाईक, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, किसन कथोरे पक्ष सोडून गेले. आपले आमदार घालवणाऱ्याला साहेबांनी नेता केलंय. काही प्रवक्ते जसं संघटनेचं वाटोळं केलं, तसं ते करत आहेत.
वरिष्ठांनी आराम करावा, हट्टीपणा करू नये- अजित पवार
वरिष्ठांनी आराम करावा, हट्टीपणा करू नये, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. आज मी थोडचं बोललो आहे. उद्या सभा घ्यायची वेळ आली तर आणखी बोलावं लागेल. काहीही झालं तरी मी आमदार कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काम करणार आहे. वरिष्ठांनी चुकलं तर माझे कान धरावेत, मी समजून घेईन, पण त्यांनी हट्टीपणा करू नये.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
त्यांनीच 2024 साली नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही असं सांगितलं आहे. आपल्या जागा कायम ठेवून आपण विधानसभेच्या 90 जागा लढवणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदेगट आणि भाजपा असं आपण निवडणुकांना सामोरे जाणार आहोत.मी कोणाचाही अपमान केलेला नाही, माझी हात जोडून विनंती आहे. आजवर माझ्यावर गुगली टाकली गेली, मी सहन केलं. मी एखादं काम होणार असेल तर हो म्हणून सांगतो, नसेल तर नाही म्हणतो. मी रोखठोक बोलणारा कार्यकर्ता आहे.साहेबांनी राजीनामा दिला तेव्हा मलाच व्हीलन करण्यात आलं. मला तसं सांगण्यात आलं तेच मी बोललो होतो. पण मला व्हीलन करण्यात आलं होतं.
मी पण महाराष्ट्र पिंजून काढणार- अजित पवार
2024 साली मोदीच येणार असं आमच्या वरिष्ठांनी सांगितलंय. मी 5 वेळा उपमुख्यमंत्री झालोय. आपल्याला पक्ष, चिन्ह आपल्याकडेच ठेवायचं आहे. आपल्याला पक्ष वाढवायचा आहे. राष्ट्रीयत्वाची मान्यता पुन्हा मिळवायचीय. 2024 च्या निवडणुकांत आपला 2004 चा 71 च्या आकड्यापुढे जायचंय. महाराष्ट्र पिंजून काढू. अजूनही विठ्ठलाने आम्हाला आशीर्वाद द्यावा. आता ते नेते सभा घेणार आहेत. मलाही बोलता येतं. मलापण तिथं 7 दिवसांनी जाऊन उत्तर द्यावं लागेल. मी गप्प बसलो तर माझ्यात खोट आहे असं लोक म्हणतील.
एका आमदाराने त्यांच्या गटात थांबणार नाही सांगितल्यावर 'तू आता निवडून कसा येतो?' अशी भाषा वापरली. हे लोक साधे आहेत, ती तुमची मुलं आहेत, त्यांच्याशी असं बोलून चालणार नाही.केंद्राच्या विचारांचं सरकार राज्यात आलं तर विकास करता येईल, केळी, कांदा, कापूस उत्पादकांना न्याय देता येईल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
साहेब कधी थांबणार- अजित पवार
पवार साहेबांच्या छत्रछायेखाली मी तयार झालो. पवारसाहेबांबरोबर मलाही लोकांनी साथ दिली. पुलोदला लोकांनी पाठिंबा दिला. 1980 साली पुलोदचं सरकार गेलं. तेव्हा सगळे आमदार काँग्रेसमध्ये आले तर सरकार कायम ठेवू असं इंदिरा गांधी यांनी सांगितलं होतं. पण त्यांना नकार देण्यात आला होता. त्यानंतर अनेक पक्ष स्थापन झाले. पुन्हा साहेब विरोधी पक्षात गेले. आजवरचा इतिहास पाहाता लोकांना करिश्माई नेता हवा असतो. पण प्रत्येकाचा एक काळ असतो. 25 ते 75 या वयाच्या टप्प्यात आपण चांगलं काम करू शकतो. प्रत्येक 25 वर्षांनी नवी पिढी येत असते. 'आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो ही आमची चूक आहे का?' असा अजित पवारांचा शरद पवारांवर थेट वार केला आहे.
1986 साली नेत्यांनी समाजवादी काँग्रेस ही काँग्रेसमध्ये विलिन केली. 1988 साली साहेबांना मुख्यमंत्रीपद मिळालं. 1988-90 काँग्रेसमध्ये राहिलो. 1991ला मी बारामतीतून खासदार झालो. प्रफुल्ल पटेलही तेव्हा खासदार झाले. दुर्दैवान राजीव गांधींचे निधन झाले. 1991 पासून साहेब पुन्हा केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून तिकडे गेले. बॉम्बस्फोटानंतर ते पुन्हा राज्यात आले.
1995 साली राज्यातलं आपलं सरकार गेलं. 1999 साली काँग्रेस एकत्र होती. पण तेव्हा सोनिया गांधी परदेशी आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं. 1999 साली आपण बाहेर पडलो.नंतर सरकार आल्यावर अनेकजण मंत्री झाले. मला फक्त सात जिल्ह्यांचं मंत्रिपद मिळालं. मी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. कोणीही कार्यकर्ता आलं तर त्याचं काम करणे एवढंच ध्येय ठेवलं. पहाटेपासून रात्रीपर्यंत काम करतो.2004 साली आपले 71 आमदार आले, काँग्रेसचे 69 आले. तेव्हा मी लहान कार्यकर्ता होतो. तेव्हा सोनिया गांधींनी विलासराव देशमुखांना आता राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल असं सांगितलं होतं. पण चार मंत्रिपदं जास्त घेऊन मुख्यमंत्रीपदाची संधी आपण देऊन टाकली. ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री दिसला असता.
2014 साली नेत्यांनी भाजपाला बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच आम्हाला देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीलाही उपस्थित राहायला सांगितले होते. तेव्हा आम्हाला का जायला सांगितलं होतं? 2017 सालीही वर्षा बंगल्यावर पाठिंब्यासाठी चर्चा झाली होती. तेव्हाही भाजपाच्या नेत्यांशी चर्चा झाली होती. मंत्रिपदाची, पालकमंत्रीपदांचीही चर्चा झाली होती. मी हे खरं सांगतो, खोटं बोललो तर पवारांची औलाद नाही. तेव्हा भाजपाने आम्ही 25 वर्षांच्या मित्रपक्षाला सोडणार नाही असं सांगितलं. तेव्हा आमच्या वरिष्ठांनी शिवसेना जातीयवादी आहे म्हणून चालणार नाही असं सांगितलं.
2019 सालीही भाजपाबरोबर बैठका झाल्या मात्र अचानक तो निर्णय मागे घेऊन शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला गेला. 2017 साली शिवसेना जातीयवादी ठरवून त्यांच्याबरोबर जाऊ नये असं म्हटलं होतं मग 2 वर्षात अचानक काय बदल झाला की त्यामुळे शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय झाला? उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मला उपमुख्यमंत्री केलं. मी कधीही हूं की चू केलं नाही. कोरोना काळात हलगर्जीपणा दाखवला नाही.
2022 साली भाजपाबरोबर सरकारमध्ये जाण्याचा निर्णय आमदारांनी घेतला होता. मात्र तो रद्द केला गेला. माझी प्रतिमा उगाच वाईट केली जाते.
तुम्ही कधी थांबणार आहात की नाही, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या ना, राजीनामा द्यायचा होता तर मग तुम्ही का दिलात? आमच्यात सरकार चालवायची धमक नाही का? राज्यातल्या प्रमुख नेत्यांना माझं कुठंतरी नाव येत असेल की, मग आम्हाला आशीर्वाद का नाही? असा कसला हट्ट आहे?