'विकासाचा विजय झाला' - पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. राज्यात महायुतीकडे सत्ता येईल असे दिसत आहे.

थोडक्यात

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवा
  • राज्यातील 288 मतदारसंघांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं, आता आज 23 नोव्हेंबरला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू
  • महायुती 224, महाविकास आघाडी 56 तर इतर 08 जागांवर आघाडीवर
  • राज्यभरात महायुतीला मिळालेल्या कौलासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मानले मतदारांचे आभार.
  • बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, हितेंद्र ठाकूर, पृथ्वीराज चव्हाण, नवाब मलिक पराभूत.
  • अमित देशमुख, धीरज देशमुख, ऋतूराज पाटील पिछाडीवर
  • मनसे उमेदवार अमित ठाकरे माहिममधून पराभूत झाले आहेत.
  • नितेश राणे, सुधीर गाडगीळ, आदिती तटकरे, रोहित पाटील विजयी झाले आहेत.

लाईव्ह कव्हरेज

ओंकार करंबेळकर

  1. निवडणुकीच्या अधिक विश्लेषणासाठी बीबीसी मराठी वाचत राहा

    महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. आज या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत.

    निवडणुका जाहीर झाल्यापासून आजपर्यंत आपण सर्व राजकीय घडामोडींची माहिती बीबीसी मराठीवर घेत आहोत.

    आज सकाळपासून सुरू असलेले निकालाचे लाईव्ह कव्हरेज आता येथे थांबवत आहोत. निवडणुकीसंदर्भातील इतर विश्लेषणात्मक बातम्या वाचण्यासाठी बीबीसी मराठीच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

    धन्यवाद.

  2. एनडीएला सलग तिसऱ्यांदा सत्ता देणारं महाराष्ट्र हे सहावं राज्य- नरेंद्र मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

    ते म्हणाले, “एका ऐतिहासिक विजयात भाजपच्या नेतृत्वातल्या एनडीएने महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षांत मोठा विजय मिळवला. राज्यात सत्ता येण्याची भाजपची ही सलग तिसरी वेळ आहे. विकासाचं व्हिजन आणि उत्तम प्रशासन यांच्याविषयी जनतेचा वाढता पाठिंबा यातून दिसून येतो.”

    सलग एनडीएला सलग तिसऱ्यांदा सत्ता देणारं महाराष्ट्र हे सहावं राज्य आहे. त्यामुळे देशभरात युतीचं महत्त्व आणखी अधोरेखित होतं आहे. भारताच्या जनतेने भाजप आणि एनडीएवर पुन्हा विश्वास दाखवल्याचा पुनरुच्चार केला.

    “उत्तम प्रशासनासाठी देशातल्या लोकांचा भाजप आणि एनडीएवर विश्वास आहे,” असं ते म्हणाले.

  3. fff
  4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले मतदारांचे आभार

    bbc
  5. महाराष्ट्रातल्या निवडणुकीतले हे 7 धक्कादायक निकाल

    विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं निकालातून समोर आलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला 50 च्या आसपास जागा मिळत आहेत.

    त्याचबरोबर या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालही लागले आहेत. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण असे मोठे नेते पराभूत झालेत. तर बच्चू कडू यांसारख्या नेत्यांनाही पराभवाचा सामना करवा लागला आहे.सविस्तर वाचा- महाराष्ट्रातल्या निवडणुकीतले हे 7 धक्कादायक निकाल

  6. बाळासाहेब थोरात संगमनेरमधून कसे पडले? त्यांना पाडणारे अमोल खताळ कोण आहेत?

    बाळासाहेब थोरात संगमनेरमधून कसे पडले? त्यांना पाडणारे अमोल खताळ कोण आहेत?

    फोटो स्रोत, facebook

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात भाजपच्या नेतृत्वातील महायुतीचा मोठा विजय झाला आहे. या निकालाने सर्व एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवले. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. यात बाळासाहेब थोरात यांचाही समावेश आहे.

    मागील 8 विधानसभा निवडणुकीत तब्बल 40 वर्षांपासून बाळासाहेब थोरात संगमनेर मतदारसंघातून निवडून येत होते. मात्र, या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे गट) अमोल खताळ यांनी थोरातांचा 10 हजार 560 मतांनी पराभव केला. अमोल खताळ यांना 1 लाख 12 हजार 386 मते मिळाली, तर बाळासाहेब थोरात यांना 1 लाख 1 हजार 826 मते मिळाली.

    1962 पासून संगमनेर मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. 1962, 1967 आणि 1972 च्या निवडणुकीत काँग्रेस नेते बी. जे. खताळ पाटील यांनी संगमनेरचे प्रतिनिधित्व केले.

    यानंतर 1978 मध्ये बाळासाहेब थोरात यांचे वडील भाऊसाहेब थोरात हे संगमनेरमधून आमदार झाले. 1980 मध्ये पुन्हा काँग्रेस नेते बी. जे. खताळ निवडून आले. 1985 पासून बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.सविस्तर वाचा- जायंट किलर अमोल खताळ कोण आहेत?

  7. जामनेरमध्ये गिरीश महाजन यांचा विजय

    girish
  8. प्रियंका गांधींचा वायनाडमधून विजय

    fff

    प्रियंका गांधी यांनी वायनाडमधून विजय मिळवला आहे. केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणाऱ्या प्रियंका गांधींनी त्यांच्या मतदारसंघातील जनतेचे आभार मानले आहेत. संसदेत जनतेचा आवाज होण्यास त्या उत्सुक आहेत असं त्या म्हणाल्या.

    राहुल गांधी यांनी या जागेचा राजीनामा दिल्यानंतर त्या पोटनिवडणूक लढत आहेत. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधीसुद्धा इतक्या अंतराने जिंकले नव्हते. वायनाडच्या लोकांचे आभार मानत प्रियंका यांनी एक्स वर एक पोस्ट लिहिली आहे.

    त्या म्हणतात, ‘वायनाडमधील माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी आपली आभारी आहे.”

    “हा विजय तुमचा विजय आहे, आणि ज्या व्यक्तीला तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडलं आहे ती व्यक्ती तुमच्या आशा आकांक्षा समजून घेते आणि तुमच्यासाठी लढते असं तुम्हाला वाटावं हे मी येत्या काळात नक्कीच प्रयत्न करेन.”

  9. आजचा निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय- उद्धव ठाकरे

    "आजचा निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे. आमच्या सभांना गर्दी होत होती. अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या सभेला गर्दी होत नव्हती मग जनतेने काय त्यांना निवडून देण्याचं ठरवलं होतं का?", असा प्रश्न शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

  10. ब्रेकिंग, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे संतुकराव हंबर्डे आघाडीवर

    नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकालही आज जाहीर होताहेत. भाजपचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी तब्बल 39,365 मतांची मोठी आघाडी घेतली असून त्यांना 5,22,490 मतं मिळाली आहेत. दुसऱ्या स्थानावर काँग्रेसचे रविंद्र चव्हाण आहेत.

    खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. काँग्रेसने वसंतरावांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. तर तिसऱ्या स्थानावर वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर आहेत.

  11. ff
  12. विकासाचा विजय झाला- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट

    महायुतीला महाराष्ट्रात मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं.

    ते म्हणाले, “विकासाचा विजय झाला. एकजुट दाखवली तर आपण नवी उंची गाठू शकतो. एनडीएच्या बाजूने हा कौल दिल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व बंधूभगिनींचे विशेषत: तरुण आणि महिलांचे विशेष आभार, तुम्ही दाखवलेलं प्रेम आणि जिव्हाळा अतुलनीय आहे. आमच्या युतीचे लोक महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत राहतील याची मी ग्वाही देतो. जय महाराष्ट्र!”

    @narendramodi

    फोटो स्रोत, @narendramodi

    “एनडीएने लोकांसाठीचे केलेल्या प्रयत्नांचं प्रतिबिंब दिसलं आहे. विविध पोटनिवडणुकीत एनडीएच्या उमेदवारांना आशीर्वाद दिल्याबद्दल मतदारांचे आभार. त्यांची स्वप्नं आणि आकांक्षा पूर्ण करण्यात आम्ही कोणतीही कसूर सोडणार नाही.” असंही ते पुढे म्हणाले.

  13. वसईतून हितेंद्र ठाकूर तर नालासोपाऱ्यातून क्षितिज ठाकूर पराभूत

    वसईतून हितेंद्र ठाकूर तर नालासोपाऱ्यातून क्षितिज ठाकूर पराभूत
  14. सांगली जिल्ह्यातील विजय उमेदवार

    • सांगली विधानसभा - सुधीर गाडगीळ -भाजपा.
    • मिरज विधानसभा - सुरेश खाडे - भाजपा
    • तासगाव कवठेमहांकाळ - रोहित पाटील - राष्ट्रवादी शरद पवार गट.
    • जत विधानसभा - गोपीचंद पडळकर - भाजपा.
    • खानापूर मतदारसंघ - सुहास बाबर - शिवसेना शिंदे गट.
    • पलूस कडेगाव मतदार संघ - विश्वजीत कदम - काँग्रेस.
    • इस्लामपूर मतदारसंघ - जयंतराव पाटील- राष्ट्रवादी शरद पवार गट.
    • शिराळा मतदारसंघ - सत्यजित देशमुख - भाजपा.
  15. अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाचा निकाल

    • अचलपूर मतदारसंघ 1-प्रवीण तायडे-भाजप-विजयी 2-बच्चू कडू-प्रहार-पराभूत.
    • तिवसा मतदारसंघ.. 1-राजेश वानखडे-भाजप-विजयी. 2-यशोमती ठाकूर-काँग्रेस-पराभूत.
    • बडनेरा मतदारसंघ. 1-रवी राणा -युवा स्वाभिमान पक्ष विजयी. 2- प्रीती बंड-अपक्ष-पराभूत.
    • मेळघाट मतदारसंघ 1-केवलरामराम काळे-भाजप विजयी. 2- राजकुमार पटेल-प्रहार-पराभूत.
    • दर्यापूर मतदारसंघ 1- गजानन लवटे- ठाकरे गट-विजयी. 2- अभिजीत अडसूळ-शिवसेना पराभूत.
    • अमरावती मतदारसंघ 1-सुलभा खोडके-राष्ट्रवादी AP-विजयी. 2-सुनील देशमुख-काँग्रेस-पराभूत
    • धामणगाव रेल्वे मतदारसंघ 1- प्रताप अडसड भाजप-विजयी 2-वीरेंद्र जगताप-काँग्रेस-पराभूत.
    • वरुड मोर्शी मतदारसंघ 1-उमेश यावलकर भाजप-विजयी 2-देवेंद्र भुयार-राष्ट्रवादी AP-पराभूत.
  16. वसई मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झाला आहे

    uf
  17. ब्रेकिंग, , संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून भाजपचे अतुल सावे विजयी

    संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून भाजपचे अतुल सावे विजयी घोषित

    संभाजीनगर पूर्व मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपचे अतुल सावे विजयी झाले आहेत. त्यांना 2777 मतांनी विजय मिळवला आहे.

    • भाजपचे अतुल सावे 93471
    • MIM चे इम्तियाज जलील 90694
  18. लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला - एकनाथ शिंदे

    महायुतीला राज्यभरात मिळालेला कौल पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या तिन्ही नेत्यांनी आपली भूमिका मांडली.

    "मोदी सरकार आमच्या पाठीमागे उभे राहिले, मोठ्या प्रमाणावर केंद्राने राज्याला लाखो कोटी रुपयांचं सहकार्य केलं. सामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू मानला, विकास आणि योजनांची सांगड घातली", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

    सामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू मानला- एकनाथ शिंदे

    "मी सीएम म्हणजे कॉमन मॅन होतो. फेसबूकवरून सरकार चालवता येत नाही. आम्ही तिघं 24 तास काम करायचो. पत्रकार परिषदेत बोलताना तुमचा पक्ष कोणता? असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून तिरकसपणे विचारलं. त्यावर राष्ट्रवादी असं उत्तर दिलं. तो नेमका कोणाचा पक्ष आहे हे जनतेने दाखवून दिलं असं शिंदे म्हणाले. त्यावर तुमचा पक्ष कोणता हेही जनतेने दाखवून दिलं असं अजित पवार म्हणाले. लाडक्या बहि‍णींना सावत्र भावांना चांगलाच जोडा दाखवला आहे" असंही ते म्हणाले.

    'एक है तो सेफ है', हा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. जनतेने त्याला मान दिला आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    "मुख्यमंत्री कोण या कळीच्या प्रश्नाला उत्तर देताना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेण्याचा पुनरुच्चार केला. तर तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि अगदी आठवले साहेबांचाही सल्ला घेऊ", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    आज लागलेल्या निर्णयात गडबड आहे असं शिवसेना (उबाठा) चे नेते संजय राऊत म्हणाले होते. त्यावर “EVM चा निर्णय मान्य आहे, मान्य आहे मान्य आहे.” असं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं.

  19. परतूर विधानसभेतून भाजपचे बबनराव लोणीकर विजयी

    परतूर विधानसभेतून भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर विजयी झालेत. परतूर विधानसभेतून बबनराव लोणीकर सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झालेत. अटीतटीच्या लढतीत लोणीकरांचा विजय झाला असून ठाकरे गटाचे उमेदवार आसाराम बोराडे यांचा पराभव झालाय.

    परतूर मधून लोणीकर विजयी झाल्याने त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केलाय. बबनराव लोणीकर यांनी 70 हजार 75 मतं मिळवून सुमारे 4 हजार 665 मतांच्या आघाडीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केलाय.

  20. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात पराभूत

    संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात पराभूत