अन्न ताजं आहे की शिळं हे शोधणारा सेन्सर
अनेकदा आपण आणलेले अन्नपदार्थ ताजे की शिळे हा प्रश्न आपल्याला पडतो. ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी एक नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आहे. उत्पादनावरील 'एक्सपायरी डेट'ला पर्याय म्हणून या सेन्सरकडे पाहता येऊ शकतं असा त्यांचा दावा आहे.