बालदिनी NSEच्या कट्ट्यावर पैशाबद्द्ल बालकांशी रंगलेल्या गप्पा
शाळेच्या वयात मुलांना जे शिकवाल ते लगेच टिपून घेतात. मग ते डान्स असो, चित्र काढणं किंवा हिशोब सांभाळणं.
नुकत्याच गेलेल्या 14 नोव्हेंबर राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) एक वेगळा प्रयोग झाला. नेहमी काखेत एक बॅग आणि सतत मोबाईलवर मान वाकडी करून दिसणाऱ्या इथल्या गर्दीत काही लहान मुलं दिसली.
बालदिनाच्या निमित्ताने NSEने शाळकरी मुलांसाठी दिवसभर इमारत खुली ठेवली होती. मुलांच्या मनात पैसा आणि आर्थिक व्यवहारांविषयी जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी हा प्रयत्न झाला.
बीबीसी मराठीच्या टीमने मग इथं जमलेल्या काही मुलांशी गप्पा मारल्या आणि त्यांना विचारलं, की ते आपल्या पॉकेटमनीचं करतात काय?
जर त्यांना पाचशे रुपये दिले तर ते काय करतील? तुम्हाला काय वाटतं, काय करतील ते?
बीबीसी प्रतिनिधी राहुल रणसुभे यांचा रिपोर्ट
एडिटिंग - ऋजुता लुकतुके
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)