समुद्राच्या पोटातली ही दफनभूमी तुमच्या अंगावर काटा आणेल!
अथांग समुद्राचं मानवी मनाला नेहमीच कुतूहल असतं. समुद्राची यापूर्वी कधीही न पाहिलेली रूपं समोर आणायला बीबीसीची ब्लू प्लॅनेट 2 टीम समुद्रतळाशी गेली होती.
त्यांना सापडलं समुद्राच्या पोटात दडलेलं एक रहस्यमयी विषारी सरोवर.
या सरोवरातून मिथेनचं सतत उत्सर्जन होतं, ज्यामुळे इथलं पाणी अतिखारट आणि सागरी पाण्यापेक्षा पाचपट जड झालं आहे.
आणि या सरोवरात जेव्हा एखादा सागरी जीव डुबकी घेतो, तेव्हा त्याला एक जीवघेणा शॉक लागतो. यात काही जीव वाचतात आणि काहींचा अंत होतो. आणि यातूनच बनते समुद्रतळाशी एक दफनभूमी.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)