बांगलादेश : रोहिंग्या निर्वासितांकडून का होत आहे पर्यावरणाला धोका?
हजारोंच्या संख्येनं बांगलादेशमध्ये आलेले रोहिंग्या उघड्यावर झोपत आहेत. कॉक्स बझार भागात टेकड्यांवर आणि शेत जमिनींवर एका पाठोपाठ तात्पुरत्या छावण्या उभ्या राहत आहेत.
वनक्षेत्राच्या जमिनीवर रोहिंग्यांकडून अतिक्रमण केलं जात आहे. जंगलतोड केली जात आहे.
प्रशासनापुढं पर्यावरण रक्षणाची समस्या आहे. तर स्थानिकांतर्फे अस्वच्छतेच्याबाबतीत तक्रारी केल्या जात आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)