कंगना राणावत-शिवसेना वादः मुंबईचा 'बाप' कोण? -पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, कंगना राणावत-शिवसेना वादः मुंबईचा 'बाप' कोण?

अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या एकमेकांवर टीका करण्याच्या वादामध्ये मुंबई कुणाच्या 'बापा'ची? हा एक उपवाद डोकावून गेला.

सध्या महाराष्ट्रात सुरू असलेला वाद सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे कारण शोधण्यावरून झाला असला तरी पुन्हा एकदा 'मुंबई कुणाची?', 'मुंबई कुणाच्या बापाची?' हे नेहमीचे चर्चेचे मुद्दे आलेच. किंबहुना या मुद्द्यावरूनच सर्व प्रकरणाच्या दिशेला नवं वळण मिळालं.

सध्याचं प्रकरण बाजूला ठेवून मुंबई कुणाच्या बापाची हे ठरवण्याऐवजी मुंबईचे 'बाप' कोण आहेत? या मुद्द्यावर विचार करता येईल. सध्याची मुंबई कुणामुळे जन्माला आली आणि तिच्यासाठी कितीजणांनी मेहनत घेतली हे पाहणं गरजेचं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)