कांदळवनांच्या जतनासाठी महिलांकडून चालवली जाणारी बोट सफारी - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, 'भारतातला एकमेव प्रोजेक्ट जो महिला चालवतात' - पाहा व्हीडिओ

वेंगुर्ला या गावातील स्वामिनी महिला बचत गटाकडून रोजगार आणि पर्यावरण संवर्धनाची सांगड घालत एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे.

या महिला बचत गटातर्फे बोट सफारीचे आयोजन केलं जातं. यामध्ये पर्यटकांना कांदळवनांची तसंच तिथल्या जैवविविधतेची माहिती या महिलांकडून राबविली जाते. हा भारतातील अशा प्रकारचा एकमेव प्रकल्प असल्याचं या महिला सांगतात.

या प्रकल्पाची सुरुवात 26 जानेवारी 2017ला झाली. वेंगुर्ला या भागात खारफुटीच्या ८ जाती आढळतात. या खारफुटीचे प्रकार ओळखणं आणि बोट चालवण्याचं प्रशिक्षण या सर्व महिलांनी घेतलं आहे.

या उपक्रमाबद्दल जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ.

रिपोर्टिंग, शूट-एडिट - राहूल रणसुभे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)