पाहा व्हीडिओ : राणेंबद्दल विचारल्यावर गडकरी म्हणतात - 'फडणवीसांना विचारा'
बीबीसीनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. यात गडकरी यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर बोलनं टाळलं. राणे यांच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच विचार असं म्हणत त्यांनी या प्रश्नाल बगल दिली. भारतात मोठ्या प्रमाणावर हायवे निर्माण करण्याचं काम सुरू आहे. देश बदलतो आहे. लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश बदलतो आहे, यावर लोकांनाही विश्वास आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.
बीबीसीचे लंडन प्रतिनिधी राहुल जोगळेकर यांनी त्यांच्याशी लंडनमधील कार्यक्रमानंतर बातचीत केली.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)