कर्जमाफी ग्राउंड रिपोर्ट : लातूरचे मोदी म्हणतात 'मला आत्महत्या करावीशी वाटते'
"महाराष्ट्र सरकारनं सरसकट कर्जमुक्ती द्यावी. मुख्यमंत्र्यांनी निस्ता कोपराला गुळ लावलायं," असं म्हणणं आहे मोदी यांचं. असं का बरं वाटतं असावं मोदी यांना?
लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोलीचे अल्पभूधारक शेतकरी गुरलिंग बाबूराव मोदी यांनी सोसायटीचं 80,000 रुपये पीक कर्ज काढलं. सरकारने आता फक्त 38,000 रुपये कर्जमाफी केली.
ही कर्जमाफी केल्याचं फक्त ऐकलं आहे, असं ते म्हणतात. "मी कर्जातून कधीच मुक्त होऊ शकणार नाही," अशी चिंताही ते व्यक्त करतात.
रिर्पोटर- मयुरेश कोण्णूर
शूटिंग आणि एडिटिंग- शरद बढे
निर्मिती- जान्हवी मुळे
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)