You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लंडनमध्ये आहेत, त्याच वाघनखांनी अफझल खानाला मारलं होतं का? इंद्रजित सावंत म्हणतात...
लंडनमध्ये आहेत, त्याच वाघनखांनी अफझल खानाला मारलं होतं का? इंद्रजित सावंत म्हणतात...
महाराष्ट्र शासन लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून वाघनखं आणणार म्हटल्यानंतर एकीकडे जल्लोष तर दुसरीकडे वादविवाद होताना दिसले.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं होतं, तेव्हा हीच वाघनखं वापरली होती, याचा ठोस पुरावा नाही, असं लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाने त्यांना सांगितलं आहे.
सरकार लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप सावंत का करतायत?
मयुरेश कोण्णूर यांनी त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली.