You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
औरंगजेब, वाघ्या कुत्रा आणि कर्जमाफी शेतकरी का भडकले? त्यांना काय हवंय?
महाराष्ट्रातील शेतकरी वर्गात सध्या कर्जमाफीची चर्चा सुरू आहे. महायुतीनं निवडणुकीआधी त्यांच्या वचननाम्यात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं आश्वासन दिलं होतं.
सरकार स्थापनेनंतर आता 4 महिने होत आले तरी सरकारकडून कर्जमाफीबाबत काही निर्णय घेण्यात आलेला नाहीये.
अशातच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय की, "शेतकरी कर्जमाफी करण्याची राज्याची परिस्थिती नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत कर्ज भरावं. कर्जमाफीचा निर्णय परिस्थितीनुरुप घेतला जाईल."
त्यानंतर अजित पवारांची ही भूमिका म्हणजे राज्य सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. सरकारच्या या भूमिकेवर शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे?
पाहा हा रिपोर्ट.
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – किरण साकळे
एडिट – मयुरेश वायंगणकर
(बीबीसी मराठीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)