You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोपी गोष्ट: आपल्या ताटातल्या भातामुळे ग्लोबल वॉर्मिंग कसं वाढतंय ?
जगभरातल्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येसाठी तांदूळ हे त्यांचं रोजचं अन्न आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 50 ते 56 टक्के लोकसंख्येसाठी भात हा त्यांचा प्राथमिक आहार आहे. याचा अर्थ रोज साधारणपणे 4 अब्ज लोक भात खातात.
पण जगभरातल्या लोकांच्या ताटात असणाऱ्या या भाताची किंमत पर्यावरणाला मोजावी लागतेय. शेतीमुळे होणाऱ्या जगभरातल्या एकूण ग्रीनहाऊस गॅसेसच्या उत्सर्जनापैकी 10% हे भातशेतीमुळे होत असल्याचा इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटचा अंदाज आहे.
भातशेती करताना मिथेनचं उत्सर्जन कसं होतं? त्यावर उपाय काय? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : गुलशनकुमार वनकर
एडिटिंग : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)